पिंपरी : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मागील काही महिन्यापासून घटल्याचे चित्र समोर आले आहे. आकडेवारीचा विचार केला असता अपघातांचे प्रमाण 20% ने व प्राण घातक अपघातांचे प्रमाण 42 टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास येत आहे. परिवहन विभागाचे सलग सहा महिने 24 तास मार्गावर कारवाई सुरू ठेवल्याने पन्नास हजाराहून अधिक वाहनावर कडक कारवाई करण्यात आली आहे. परिणामी रस्त्यावरती होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले.
पुणे मुंबई दिवस कधी मार्गावर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने वेगवेगळे उपायोजना केल्या. यामध्ये मागील सहा महिन्यात पुण्यासह रायगड, पिंपरी चिंचवड, पनवेल आरटीओच्या वायू वेग पथकाने 24 तास कारवाईचा बडगा उगरल्याने डिसेंबर 22 ते मे 22 दरम्यान अपघातांचे प्रमाण घटल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वात जास्त कारवाई वेगाने धावणाऱ्या वाहनावरती करण्यात आली आहे. दहा हजाराहून जास्त वाहने निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने धावताना आढळल्याने त्यांच्यावर स्पीड लिमिट कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.

कसा पहाल स्पीड लिमिट कॅमेराचे ठिकाण….
प्रत्येक रोगावरती उपचार असतो तसंच रस्त्यावरून वाहन चालवताना आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ नये आणि वाहन चालकांना सतर्क करण्यासाठी RADARBOT नावाची ॲप मदतीला धावून आले आहे. यासाठी आपणास गुगल प्ले वर हे ॲप डाऊनलोड करायचे आहे. आपले वाहन चालवताना या ॲपला ओपन करून ठेवायचे यामुळे जेव्हा तुम्ही वाहन महामार्गावर चालवत असतात आपला वाहनाचा वेग अधिक झाला तर आपल्यावर कारवाई होऊ शकते का? याबाबत अलर्ट हे ॲप आपल्याला ताबडतोब देत राहील. या ॲपमुळे महामार्गावरच नव्हे तर शहरातही स्पीड लिमिट कॅमेऱ्याचा अलर्ट देणार आहे.




