पिपंळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस कार्यालय सुरू होणार – नाना काटे
पिंपरी – रहाटणी पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस सुरू होणार आहे. याबाबत भारतीय डाकघर विभाग व महापालिका यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांना पत्राने कळविले आहे.
स्थानिक नगरसेवक नाना काटे यांनी पोस्ट ॲाफीस व महापालिका विभागाकडे मागणी केली होती. यामध्ये प्रभाग क्र २८ रहाटणी, पिंपळे सौदागर या प्रभागात ८० हजार ते १ लाख लोकसंख्या आहे. या परिसरात खासगी व सरकारी शाळा, महाविद्यालये, तसेच संरक्षण विभागाचे कार्यालय, निवास्थान, सरकारी व खासगी बॅका व आयटी पार्कचे कार्यालय आहेत. परिसरातील नागरिकांना पोस्ट ॲाफीस बाबत कामे करण्यासाठी औध, पिंपरी अथवा चिचवडच्या पोस्ट ॲाफीसमध्ये जावे लागत होते. यामुळे नागरिकांना नाहक त्रास व मोठी गैरसोय होत असल्याचे पिंपळे सौदागर परिसरात पोस्ट ॲाफीस व त्यासाठी लागणारी जागा भारतीय डाक विभाग व मनपा विभाग यांच्या निदर्शनास आणुन दिले होते. २०१२ पासून नाना काटे व शितल काटे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता.
आता त्या मागणीला यशप्राप्त होत असून पोस्ट ॲाफीस विभाग व महापालिका यांनी रहाटणी पिपंळे सौदागर येथे नविन प्रशासकीय कामास सुरूवात करण्यात आली आहे. याबाबत नाना काटे यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे रहाटणी पिपंळे सौदागर परिसरात नवीन पोस्ट ऑफिस सुरु होणार असल्याने नागरिकाची पोस्ट ॲाफीसची वणवण संपणार आहे याचे खरे समाधान आहे नाना काटे यांनी म्हटले आहे.




