
पिंपरी :- धारदार कोयत्याचा धाक दाखवुन सोनसाखळी, मोबाईल चोरी, वाहनचोरी करणारी टोळी पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने जेरबंद केली आहे. निगडी, चिखली, भोसरी परिसरामध्ये घडलेले सोनसाखळी चोरीचे गुन्हे, चिखली परिसरातील तोडफोड व धारदार कोयत्यांचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करुन गुन्हेगारांच्या टोळक्याने केलेले मोबाईल चोरीचे व वाहनचोरीचे गुन्हयांमध्ये गुन्हयाचे घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी युनिट २ पथक करीत होते. गोपनिय बातमीदारांकरवी माहीती घेवून गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले.
निष्पन्न झालेल्या गुन्हेगारांचे मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण करुन व गुन्हेगारांचा सातत्याने शोध घेत १) महमंद मुस्ताक सिध्दीकी (वय २४ वर्षे, रा. यहिया कॉलनी, सिध्देश्वर मंदिराच्या पाठीमागे, पटेलनगर, लातूर), पांडुरंग बालाजी कांबळे (वय २३ वर्षे, रा. मु.पो. गौर ता. निलंगा जि. लातूर), तुषार ऊर्फ बाळया अशोक माने (वय २४ वर्षे, रा. वराळे रोड समता कॉलनी, तळेगाव दाभाडे), अर्जुन संभाजी कदम (वय २५ वर्षे सध्या रा. नेवाळे वस्ती, केशवनगर, चिखली, पुणे. मुळ रा. गौर ता. निलंगा जि. लातुर) व ४ अल्पवयीन साथीदार यांना शिताफीने ताब्यात घेतले.
तसेच चोरीचे दागीने विकणारा व विकत घेणारा पक्षाल मनोज सोलंकी (वय २३ वर्षे रा. प्रेमलाके पार्क, चिंचवड), व मुराद दस्तगिर मुलाणी (वय ३६ वर्षे, रा. वैभवनगर समोर, पिंपरीगाव, मुळगाव- कलेढोण ता. खटाव जि. सातारा) यांना ताब्यात घेवून आरोपींकडे अत्यंत कौशल्याने तपास केला असता आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले ४ धारदार जम्बो कोयते १ तलवार, चोरीच्या ५ मोटर सायकल, ७ महागडे मोबाईल असा एकूण २,४२,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल व २,५०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने असा एकूण सुमारे ५,००,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीत यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत तसेच लातूर जिल्हयामध्ये केलेले’ उघडकीस केलेले गुन्हे खालीलप्रमाणे-
चैनचोरी गुन्हे उघड एकूण १३..
निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५००/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४२२ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४५१ /२०२३ भादवि कलम ३९२, ३४० एम आय डी सी भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३५३/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ६६१९ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ देहूरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ११८/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ देहूरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २७५/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ दीघी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २५१/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ लातुर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४५/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ एमआयडीसी लातूर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३९४ /२०२३ भादवि कलम ३९२, ३४ एमआयडीसी लातुर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४९८ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ एमआयडीसी लातुर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५४५/२०२३ भादवि कलम ३९२, ३४. एमआयडीसी लातुर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १५५/२०२३ भादवि कलम ३९२, ३४
वाहनचोरी गुन्हे उघड एकूण ४…
भोसरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६७९/२०१३ भादवि कलम ३७१ रावेत : पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३१७/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे देहूरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४१५/२०२३ भादवि कलम ३७९ मधील चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५५२ / २०२३ भादवि कलम ३७९ मधील
मोबाईलचोरी गुन्हा उघड एकूण ७ मोबाईल जप्त –
चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५३३/२०२३ भादवि कलम ३७९ मधील
चिखली तोडफोड..
चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५३२/२०२३ भादवि कलम ४२७, ३४, आर्म अॅक्ट ४ (२५) याप्रमाणे सोनसाखळी चोरीचे १३, वाहनचोरीचे ७, मोबाईल चोरी १ व तोडफोडीचा १ असे एकूण २२ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपीत यांचेकडे सखोल तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार दिपक खरात, प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत, आतिष कुडके, नामदेव कापसे, अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे, संदेश देशमुख, उध्दव खेडकर यांनी केली आहे.




