
चिंचवड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मेक इन इंडिया, ‘मेड इन इंडिया’ हे धोरण आहे. शेतकऱ्यांचा माल विदेशात गेला तर त्याला सफरचंदचा भाव मिळेल. त्यामुळे सरकारने आयात-निर्यात धोरणात स्पष्ट भूमिका घेतली.
तर, एकही जागा न मागता एनडीएला पूर्ण ताकदीने पाठिंबा देवू असे प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने लावलेले 40 टक्क्यांचे शुल्क चुकीचे असून त्याविरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
चिंचवड येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुनाल खेमनार, पिंपरी महापालिका समाज कल्याण विभागाचे उपायुक्त अजय चारटणकर, विठ्ठल जोशी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट आदी उपस्थित होते.




