पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा आणि लोकसभा महायुतीतर्फे लढणार मात्र महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या वरती होतील असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे, असे वक्तव्य देखील अजित पवार यांनी केले आहे. ते चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
राज्यात सत्तेत सहभागी झाल्यानंतर पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात आज पहिल्यांदाच आले होते त्यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक माजी आजी नगरसेवकांनी मोठी तयारी केली होत
अजित पवार म्हणाले, ‘विधानसभा आणि लोकसभा आपण महायुतीतर्फे लढणार आहोत. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच काय? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण येईल. या पूर्वी काँग्रेस पक्षासोबत आघाडी होती ती परिस्थिती राहील, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्या- त्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील नेत्यांनी आणि नागरिकांनी ठरवायचं की युती करायची की एकट्याच्या ताकदीवर लढायचं. निवडून येणार असाल अशी खात्री असेल तर तुम्ही युती करू नका. मतांची विभागणी न होता युती केली पाहिजे, तर युती करा, असे अजित पवार म्हणाले




