पिंपरी : डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सुरु करण्यात आली आहे. योजने अंतर्गत उपलब्ध शस्त्रक्रियांचे लाभ पात्र गरजू नागरिकांना घेता येणार आहे. या आयुर्वेद रुणालयामार्फत विशेष योजना सुरु केली आहे.
यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मूळव्याध, भगंदर, फिशर शस्त्रक्रिया आणि नॉर्मल व सिझेरियन प्रसूती करण्यात येते. डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयात संधिवात, आमवात, पक्षाघात, वातरक्त, मधुमेह, दमा, केस गळणे, पांढरे होणे, रक्तदाब, लठ्ठपणा, सर्व प्रकारच्या पंचकर्म चिकित्सा सल्ला मार्गदर्शन, बालपक्षाघात, पोटदुखी जंताचा त्रास, लहान मुलांमधील त्वचा विकार, मुलांचे वजन न वाढणे-भूक न लागणे, शय्यामूत्रता (अंथरुणात लघवी करणे), स्त्रियांचे सर्व विकार, वंध्यत्व चिकित्सा, प्रसूतिपूर्व तपासणी, त्वचा विकार, सौंदर्योपचार, हृदयरोग, पोटाचे विकार, पित्ताशयातील खडे, मुतखडा, शरीरावरील लहान-मोठ्या गाठी, मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसिल, थायरॉईडच्या गाठींची शस्त्रक्रिया व मोतीबिंदू ऑपरेशन अल्प दरात उपलब्ध आहेत. चिकित्सा झालेल्या रुणांना पुढील उपचारासाठी आंतररुग्ण विभागात मोफत राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.




