पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटी बस थांब्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांकडे अल्पवयीन मुले जबरदस्तीने पैसे हिसकावून घेत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यातच भटकी कुत्रे, मद्यपी यांनीही बसथांब्याचा आधार घेतला आहे.
रहाटणीमध्ये बीआरटी बस थांब्यावर थांबलेल्या प्रवाशांकडे १० ते १८ वयोगटातील तीन मुले आली. त्यांनी प्रवाशांकडे पाचशे रूपयांची मागणी केली. प्रेमाने, नंतर दमदाटी करू लागले. त्यांच्यापैकी एका मुलाच्या हातात लाकडी फळी होती. प्रवाशांना त्याचा धाक ते दाखवू लागले. घाबरलेल्या प्रवाशांनी मुलांच्या तावडीतून सुटका करत करून घेत, बसथांब्याच्या बाहेर पळ काढला. त्यानंतरही ती मुले प्रवाशांच्या मागे पळत सुटली. मात्र, काही नागरिकांनी त्यांना दम दिला. त्यानंतर ती मुले पळून गेली. बीआरटी बस थांब्यावर अगोदर सुरक्षारक्षक नेमले होते. मात्र, आता त्याठिकाणी सुरक्षारक्षक दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारांना वाव मिळाला आहे. भटकी कुत्री, मद्यपींचे आश्रयस्थान बनले आहे..




