पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार यासह देशातील विविध भागातून अनेक नागरिक छोटे-मोठे व्यवसायिक पिंपरी चिंचवड शहरात व्यवसाय करत आहेत. मात्र व्यवसाय आणि राहण्यासाठी वेगवेगळी किमंत देण्यापेक्षा “नीचे दुकान उपर मकान” म्हणून राहताना दिसत आहेत. याच भूमिकेमुळे छोट्या-मोठ्या घटनांमुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आज पूर्णानगर चिंचवड येथे रक्षाबंधन दिवशीच एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शहरात कपड्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स, स्वीट मार्ट, इलेक्ट्रॉनिक्स, रंगांची दुकाने, हार्डवेअर, मेडिकल अशा विविध व्यवसायामध्ये परराज्यातील नागरिकांनी ठिकठिकाणी व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र, यामधील भयानक वास्तवता असे आहे की, शहरात व्यवसायासाठी व राहण्यासाठी वेगवेगळी किंमत मोजावी लागेल म्हणून परराज्यातील व्यक्ती व्यवसाय आणि राहण्याचे ठिकाण एकत्रच करून राहताना दिसत आहेत. मागील वर्षी म्हाळसाकांत चौकातील प्राधिकरण निगडी येथे साडीच्या दुकानाला आग लागून एका महिलेचा होरपळून झाल्याची घटना घडली होती. आता त्याचीच पुनरावृत्ती पूर्णा नगर चिंचवड येथील इलेक्ट्रिकल दुकानाला आग लागून घरातील नवरा- बायको आणि दोन मुलांसह एकूण चार जणांचा आज पहाटे आग लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
एकूणच पिंपरी चिंचवड शहरात महापालिका प्रशासनाने यावरती कडक धोरण अवलंबले पाहिजे. शहरातील अनेक भागात नीचे दुकान उपर मकान हा कन्सेप्ट राबविला जात आहे. मात्र, महापालिका प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसत आहे. कधी व्यवसाय करणारे त्याठीकाणी राहतात. तर कधी त्यांचे कामगार वर्ग अशा छोट्या दुकानांमध्ये राहताना आढळून येतात. यावरती पालिकेने तातडीने सर्वेक्षण करून कडक ठोस उपाययोजना केली पाहिजे. अण्णा तंगी भविष्यामध्ये अशाच मानव आणि सत्र सुरू राहणार आहे.
अशा स्थितीत जास्त राहत असल्याने शहरात मागील काही महिन्यात अशा घटना घडल्या आहेत की दुकानांमध्ये लागलेल्या आगे मध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडली आहे.


