पिंपळे सौदागर ; वै.ह. भ.प पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेज मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस व राखी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेजचे संस्थापक मा. जगन्नाथ काटे व प्राचार्या मा.सौ.धनश्री सोनवणे यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवण्यात आला व राष्ट्रगीत सादर करत ध्वजाला मान वंदना देण्यात आली. तसेच हॉकीपटू मेजर ध्यानचंद याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेजच्या प्राचार्या मा. धनश्री सोनवणे यांनी क्रीडा दिना विषयी माहिती देत सांगितले की, शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा हा प्रकार ही आपल्या देशात चांगल्या प्रकारे रूढ झालेला आहे. तरुणांना खेळात रुची निर्माण व्हावी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांची माहिती तरुण पिढीच्या आयुष्याचा एक घटक बनावी या दृष्टीकोनातून भारतीय क्रीडा मंत्रालयाने खेळाच स्वरूप देशव्यापी विश्वव्यापी बनवण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे आयोजन केले आणि २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून जाहीर करण्याचे ठरवले.
शाळेचे क्रीडा शिक्षक राहुल कोरे यांनी खेळाचे महत्व पटवून देत सांगितले की, हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा याच दिनी जन्मदिन असून हॉकी या प्रकारामध्ये मेजर ध्यानचंद यांनी आपल्या देशाला अनेक पुरस्कार मिळवून दिले. ऑलम्पिकमध्ये एक वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. या कार्यक्रमा बरोबरच राखी पौर्णिमा देखील साजरी करण्यात आली. पूर्व प्राथमिक मधील विद्यार्थीनींनी पूर्व प्राथमिक मधील विद्यार्थ्यांना राखी बांधून या दिनाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांन समवेत सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी,आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेष्ठ मोरे या विद्यार्थ्यांने केले. तर आभार लक्ष्मी देवरे या विद्यार्थीनींने मानले.




