पिंपळे सौदागर: प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रोडवरील पीस व्हॅली सोसायटी ते साई पर्ल सोसायटी पर्यंत तसेच राजमाता जिजाऊ उद्यान ते कुंजीर चौक साई प्लाटीनिम सोसायटी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाण्याची नवीन लाईन टाकण्याचे काम रखडले होते. स्थानिक नगरसेवक नाना काटे यांनी वेळोवेळी महापालिकेच्या संबंधित अति.आयुक्त तसेच पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे पत्राद्वारे व भेट घेवून पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळून त्या पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरुवात झाली आहे.
प्रभागातील राजमाता जिजाऊ उद्यान लगत नवीन २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकीन बांधून तयार आहे. परंतु हे पाईप लाईन टाकण्याचे काम रखडल्यामुळे या सोसायटीना पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण होत होती. स्थानिक नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत होते, हि बाब लोकप्रतिनिधी या नात्याने लक्षात आल्यानंतर यावरती उपाययोजना करण्यासाठी नाना काटे यांनी पुढाकार घेतला.
मागील आठवड्यात पालिकेच्या संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी यांच्या समवेत बैठकीत योग्य पर्याय काढून लवकरात लवकर १२ इंच नवीन पाण्याच्या पाईप लाईनचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक नगरसदस्य नाना काटे व शितल काटे याच्या पाठपुराव्यास यशप्राप्ती म्हणून कुणाल आयकॉन रोड वरील पीस व्हॅली सोसायटी ते साई पर्ल सोसायटी पर्यंत, तसेच राजमाता जिजाऊ उद्यान ते कुंजीर चौक साई प्लाटीनिम सोसायटी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस आज १२ इंच व्यासाची पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे कुणाल आयकॉन रोडवरील संबंधित सोसायटीना नवीन बांधलेल्या २५ लाख लिटर पाण्याच्या टाकीमधून मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


