पिंपरी (प्रतिनिधी) वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या कामगारांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे रुग्णालयाची व शासनाची फसवणूक केली जात होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक सप्टेंबर पूर्वी म्हाळुंगे येथील शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे घटना घडली.
डॉ. विकास रामचंद्र साबळे ( वय ५१, रा. चाकण) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयसी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे येथील शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करतात. फिर्यादी यांच्या नावाचा बनावट शिका बनावट सही करून येणाऱ्या कामगारांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देत फिर्यादी आणि मनाची फसवणूक केल्याचा प्रकार उडकीस आला आहे.




