नवी दिल्ली : सेवा क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय काही प्रमाणात कमी झाला असून तो ६०.९% इतका मोजला गेला. जुलै महिन्यामध्ये हा निर्देशांक ६२.३ इतका होता. या निर्देशांकात अल्प प्रमाणात घट झाली असली तरीही चिंतेचे कारण नाही. कारण निर्देशांक: ५० अंकांच्या वर असल्यानंतर या क्षेत्राची उत्पादकता वाढत असल्याचे समजले जाते.
सध्या हा निर्देशांक ५० अंकापेक्षा कितीतरी जास्त आहे. गेल्या आठवड्यात मॅन्युफॅक्चरिंग. क्षेत्राची उत्पादकता किंचित कमी झाली होती. मात्र या दोन्ही क्षेत्राचे उत्पादकता ५० अंकांच्या वर असल्यामुळे याचा शेअर बाजारावर तितकासा नकारात्मक परिणाम झाला नसल्याचे हा निर्दे शांक तयार करणाऱ्या एस अॅण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स या संस्थेने म्हटले आहे. २०१० नंतर प्रथमच हा निर्देशांक सध्या इतका दीर्घकाळ उच्च पातळीवर आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढल्यामुळे पहिल्या तिमाईचा विकास दर वाढण्यास मदत झाली. सेवा क्षेत्राला देशांतर्गत मागणी बरोबरच युरोप उत्तर अमेरिका आणि मध्यपूर्वेतून बऱ्याच ऑर्डर मिळत आहेत.
या ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रयत्न हे क्षेत्र करत आहे. त्यामुळे या क्षेत्रातून भांडवलाचा वापरही वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. १० ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर झाले होते. या पत धोरणात रिझव्ह बँकेने सर्वसमावेशक विचार करून महागाई जास्त पातळीवर असूनही व्याजदरात वाढ न करता फक्त भांडवल सुलभता कमी केली होती. त्यामुळे या क्षेत्राला पुरेसा भांडवल पुरवठा कमी व्याजदरावर उपलब्ध झाला आहे. यामुळेही या क्षेत्राची उत्पादकता उच्च पातळीवर राहण्यास मदत होत आहे. आता पुढील पतधोरण सहा ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. महागाई सध्या जास्त पातळीवर असल्यामुळे या क्षेत्राला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी त्याचा उत्पादकतेवर फारसा नकारात्मक परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे.



