पिंपरी, ता. १२ सप्टेंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एका मतदान केंद्रावर दीड हजारांपर्यंत मतदार बंधनकारक आहेत. मात्र, नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने मतदारसंख्याही वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने घरोघरी (हाउस टू हाउस) जाऊन मतदारांचे सर्वेक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.
त्याअंतर्गत शहरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. तसेच, नवमतदार नोंदणी, मयत किंवा स्थलांतरित मतदार वगळणे, मतदार यादी वा मतदान कार्डावरील नाव, वय, पत्ता, लिंग अशा स्वरूपाच्या दुरुस्त्या करण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एक जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणकार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार एक जूनपासून निवडणूकपूर्व मतदारयाद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रमाची मुदत आहे. २०१९ च्या लोकसभा व विधानसभेपेक्षा सध्या संबंधित मतदार केंद्रांच्या कक्षेतील मतदारसंख्या वाढलेली आहे. ती एका केंद्रावर दीड हजारापर्यंतच राहील यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. त्याअंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, प्रमाणिकरण करणे, दुबार व समान मतदार नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानंकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा, विभाग अथवा भाग यांची आवश्यकतेनुसार पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या रचनेत सुधारणा व मतदान केंद्रांच्या सीमांची पुनर्रचना केली जाणार आहे. मतदारयाद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रम- २१ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर ः मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण, मतदारयादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे; अस्पष्ट, अंधूक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून तो दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे, कंट्रोल टेबल अपडेट करणे.
३० सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर ः मतदार नोंदणी संदर्भात नमुना एक ते आठ तयार करणे, एक जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे- १७ ऑक्टोबर ः एकत्रित प्रारूप यादी तयार करणे- १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर ः दावे व हरकती स्वीकारणे- २६ डिसेंबर २०२३ ः दावे व हरकती निकालात काढणे- १ जानेवारी २०२४ ः अंतिम यादी प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटा बेस अपडेट करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे- ५ जानेवारी २०२४ ः अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणेविधानसभा मतदारसंघनिहाय मतदार(३१ मे २०२२ च्या नोंदणीनुसार)मतदारसंघ / मतदारपिंपरी / ३,७६,४७०चिंचवड / ५,८६,८४९भोसरी / ५,२७,७९९एकूण / १४,९१,११८(ताथवडे गावाचा समावेश भोर विधानसभा व बारामती लोकसभा मतदारसंघात होतो. तेथील मतदारसंख्या नऊ हजार ५७५ आहे.)अशा होतील सुधारणा- मतदान केंद्र पुनर्रचनेनुसार एका केंद्रावर १५०० मतदार- इमारतीच्या तळमजल्यावरच मतदान केंद्राची निर्मिती- इमारतीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर केंद्र तळ मजल्यावर आणणार- मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करणे, नावामध्ये दुरुस्ती करणे आणि आधार कार्ड लिंक करणे- निवडणूक आयोगाच्या व्होटर हेल्पलाइनचा वापर करून दुरुस्ती करता येते.
दुरुस्तीसाठी एसएमएस आणि आयव्हीआरएस कॉलिंगचा वापर केला जात आहेऑनलाइन मतदार नोंदणीसाठी https://voters.eci.gov.in आणि VOTER HELPLINE APPमतदार नोंदणीसाठी कागदपत्रे- रहिवासी पुरावा म्हणून वीज बिल, पाणीपट्टी, आधार कार्ड, बॅंक पासबुक, व्हिसा, नोंदणीकृत विक्रीखत किंवा भाडेकरार- वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्य शिक्षण मंडळाचे दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.




