चिंचवड: महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेशजी बैस यांनी चिंचवड येथील हुतात्मा चाफेकर वाड्यास व गुरुकुलम् आश्रमशाळा पारधीसमाज विकास प्रकल्पास भेट दिली. यावेळी महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी पद्मश्री गिरीष प्रभुणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अश्विनी जगताप, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, माजी नगरसेवक शंकर जगताप, नामदेव ढाके, तुषार हिंगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, अश्विनी चिंचवडे तसेच उप आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.




