पिंपरी (प्रतिनिधी) पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवात बाहेरगावाहून व पिंपरी चिंचवडसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक देखावे पाहण्यासाठी पुण्यात गर्दी करतात. त्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यापासून आता कॅशलेस सुविधा पीएमपी देणार आहे. आता खिशा पैसे नसतानाही पीएमपीने प्रवास करता येणार असून लवकरच पीएमपी बसमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध होणार आहे. बसमधून प्रवास करताना, आता सुट्टे पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही. शिवाय सुट्ट्या पैशांवरून होणाऱ्या रोजच्या कटकटीवर पीएमपीएमलने उपाय शोधला आहे. लवकरच पीएमपीएमएल बसमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध होणार आहे. ही सुविधा पुढील आठवड्यापासून सर्व बसमध्ये उपलब्ध होणार असल्याचे पीएमपीएमकडून सांगण्यात आले आहे.
पीएमपी बसमधून प्रवास करताना प्रामुख्याने बसवाहक आणि प्रवाशांमध्ये रोजच सुट्या पैशांवरून वाद होत असतात. अनेकदा प्रवाशांना मध्येच उतरविले जाते. तर, प्रवासीही २५ रुपयांच्या तिकीटासाठी ५०० रुपयांची नोट देतात. त्यातून रोजच वादाचे प्रसंग ओढावतात. त्यामुळे हा कॅशलेस सुविधेचा पर्याय प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कॅशलेस सेवा सुरू झाल्यावर बसमधून प्रवास करताना, आता सुट्टे पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही. बसमध्ये ऑनलाइन पेमेंटची सुविधा म्हणजेच युपीआय कोड बसमध्ये लावण्यात येणार आहे. ही सुविधा पुढील आठवड्यापासून सर्व बसमध्ये उपलब्ध होणार असल्याचे पीएमपीएमएलकडून सांगण्यात आले आहे.
पीएमपीएमलच्या ताफ्यात सध्या २ हजार १८१ बस आहेत. १५ डेपो अंतर्गत या गाड्यांच्या माध्यमातून पुणे, पिंपरी- चिंचवड, पीएमआरडीए भाग आणि काही ग्रामीण भागात ३७८ मार्गावर बससेवा पुरविली जाते.
बसमध्ये “यूपीआय कोड” स्कॅनर
‘पीक अवर’मध्ये तर पीएमपीच्या बसमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळते. यावेळी प्रवाशी आणि वाहकांना सुट्ट्या पैशांसाठी मोठी कसरत करावी लागते. सुट्ट्या पैशावरून अनेक वेळा वाहक व प्रवाशांमध्ये वादही होतात. दरम्यान, यावर पीएमपीएमलने तोडगा काढला आहे. त्यामुळे वाहक आणि प्रवाशी दोघांचीही सुट्ट्या पैशांच्या कटकटीतून सुटका होणार आहे. आता यूपीआय कोड स्कॅन करून प्रवाशांना पीएमपीएलचे तिकीट काढता येणार आहे. पीएमपीएमल प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आठवड्यापासून पीएमपीएमलच्या सर्व बसमध्ये स्कॅनर उपलब्ध होणार आहे.
‘फोन पे, गूगल पे’ ची सुविधा सुरू होणार
पीएमपी बसमध्ये गुगल पे आणि फोन पेची सुविधा देण्यात येणार आहे. युपीआय कोड स्कैन करत प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. ऑनलाइन पेमेंटमुळे सुट्ट्या पैशांचा घोळ मिटणार आहे. रोजच्या सुट्या पैशांची कटकट थांबणार आहे.




