कान्हे (वार्ताहर) आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकीचे आयोजन कामशेत पोलीस स्टेशन व वडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले. ही बैठक तनिष्का मंगल कार्यालय, कान्हे येथे झाली. या वेळी गणेश मंडळांनी व पदाधिकाऱ्यांची गणेश उत्सवात येणाऱ्या अडचणी सूचना मांडण्यात आल्या.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक सहायक पोलीस अधीक्षक लोणावळा ग्रामीण विभाग सत्यसाई कार्तिक यांनी मार्गदर्शन केले. येणाऱ्या गणेश उत्सव आनंदात व उत्साही वातावरणात पार पाडण्याचे मंडळांना आवाहन केले. डीजे वाजवल्यामुळे दुष्परिणाम विनापरवाना कुठल्याही प्रकारची स्टेज, मंडप, कमानी टाकण्यात येऊ नये. गणेश मंडळांनी ठिकठिकाणी स्वयंसेवक नेमावे. जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, शांततेमध्ये मिरवणुका काढाव्यात, मंडळाच्या आवारात सीसीटीव्ही बसवावे, वाहतुकीस अडचण होईल असे रोडवर स्टेज घालू नये, मंडळांनी आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात तसेच इतर होणारे वाद विवाद टाळावे.
या वेळी सहायक पोलीस अधीक्षक लोणावळा ग्रामीण सत्यसाई कार्तिक कामशेत पोलीस ठाण्याची निरीक्षक रवींद्र पाटील, वडगाव ठाणे पोलीस निरीक्षक कुमार कदम तसेच वडगाव, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष व प्रत्येक गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.




