पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील – ‘मेट्रो’च्या दोन्ही मार्गाचा विस्तार झाला. पुण्यापेक्षा पिंपरी ते सिव्हिल कोटदरम्यानची मेट्रोची सेवा सुसाट धावत असून पीएमपीची फीडर सेवा मात्र, थंडावली आहे. पिंपरी, नाशिकफाटा, दापोडी या मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी पीएमपीनेi सुरू केलेली फीडर सेवा देण्यात सध्या तरी पुणे महानगर परिवहन महामंडळ कमी पडत आहे. त्यामुळे पीएमपीने सुधारणा करण्याची गरज आहे. तर, मेट्रोच्या पिंपरीच्या प्रवाशांनी उच्चांक गाठत १५ ऑगस्ट रोजी पुण्यापेक्षाची अधिक म्हणजेच दोन लाख प्रवाशांनी एकाच दिवशी प्रावस करून इतिहास रचला आहे. त्यामुळे मेट्रोला पिंपरीकरांची पसंती मिळत आहे.
पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्टदरम्यान एक ऑगस्टपासून ‘मेट्रो’ सेवेचा विस्तार झाला. ‘मेट्रो’ सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांना ‘मेट्रो’ स्थानकांपर्यंत जाण्यासाठी व तेथून घरी जाण्यासाठी पीएमपीने ‘फीडर सेवा’ सुरू केली आहे. ‘पीएमपी’कडून सध्या मेट्रो स्थानकापासून ‘फीडर सेवेचे मार्ग चालविले जात आहेत.
पीएमपी बस ४५ मिनिटे ते एक तासाने धावते. तर, ‘मेट्रो’ची दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे ४० हजारांपुढे गेली आहे, तर सुट्टीच्या दिवशी मेट्रोची प्रवासीसेवा पिंपरीत उच्चांकी अर्थात दोन लाख एवढी नोंदविली आहे. मात्र, ‘पीएमपी’च्या ‘फीडर’ सेवेचे प्रवासी वाढण्यास तयार नाहीत.
‘पीएमपी’ची प्रतीक्षा
‘पीएमपी’कडून पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी, डांगे चौकमार्गे चिंचवड, काळेवाडी फाटा, सांगवी मार्गे दापोडी, भोसरी आदी मार्गावर सुरू असलेल्या ‘फीडर सेवे’तून दिवसाला सुमारे दोन ते तीन हजार प्रवासी मिळत आहेत. ‘मेट्रो’ स्थानकाच्या परिसरातून पीएमपी बस ४५ मिनिटे ते एक तासाने धावते. त्यामुळे मेट्रोतून बाहेर आलेल्या प्रवाशांना पीएमपीने प्रवास करण्यासाठी बरीच वाट पाहावी लागते. त्यामुळे बहुतांश प्रवासी हे इतर पर्यायी वाहने प्रवासासाठी निवडतात. पीएमपी प्रवासी संख्या मेट्रोच्या किमान १० टक्के पण नसल्याचे चित्र आहे. काही मेट्रो स्थानकावरून शेअर रिक्षाचा पर्यायही निवडला जातो. पिंपरी मेट्रो स्थानकावरून उतरल्यावर अनेकजण शेअर रिक्षाने प्रावस करताना दिसतात.
नागरिकांना बसची वाट पा पहण्यात बराच वेळ थांबावे लागते. पिंपरी मेट्रो स्टेशनवर पीएमपीची बराच वेळ वाट पहावी लागते. मेट्रो आणि पीएमपी यांचे नियोजन दिसत नाही. त्यामुळे पीएमपीचा पर्याय नागरिक निवडत नाहीत. मेट्रोप्रमाणेच बसची वारंवारिता प्रत्येकी १० ते १५ मिनिटांनी असावी. तसेच सुट्टीच्या दिवशी सलग बस ठेवाव्यात, ज्यामुळे प्रवासी सुखकर होईल.
कमल गायकवाड, पिंपरी




