छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
यावेळी मंत्रिमंडळाने दोन महत्त्वाचे निर्णय यावेळी घेतले आहे. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी ४५ हजार कोटीचे निधी देण्याची घोषणा करण्यात आली. याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्हा धाराशिव म्हणून अधिकृत घोषणा करून फलकांचे नामकरण करण्यात आले.



