पिंपरी (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहरच्या (जिल्हा) वतीने शहरातील मंडळे, सोसायट्यांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२३चे आयोजन करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ७५ हजार, तृतीय क्रमांकास ५० हजार तर उत्तेजनार्थ विजेत्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे मंडळ सोसायटी नोंदणीकृत असावेत, पंचानी दिलेला निकाल हा अंतिम असेल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर असेल. अर्ज मिळण्याचे व भरून देण्याचे ठिकाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, खराळवाडी, पिंपरी असून अर्जासाठी ५०० शुल्क असणार आहे. जास्तीत जास्त मंडळे, संस्था, गृहनिर्माण सोसायटयांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे (९९२२५०१५८६, ९८९०१३९९९६) संपर्क साधावा.




