पिंपरी (प्रतिनिधी) प्रसिद्ध अभिनेत्री – सई ताम्हणकर हिने शहराच्या स्वच्छतेत हातभार लावत स्वच्छता पंधरवड्यात सहभाग नोंदविला. महापालिकेतर्फे इंडियन स्वच्छता लीग २.० अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून शनिवारी (दि. १६) निगडीत सेवा सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर, महापालिका आयुक्त शेखर सिंह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, अण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, राजेंद्र शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. सिंह यांच्या हस्ते पालिकेच्या स्वच्छ भारत अभियान ब्रॅन्ड अॅम्बेसिडर राष्ट्रीय कबड्डीपटू पुजा शेलार, संगिता जोशी-काळभोर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, नागरिकांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाल्या, जिथे स्वच्छता असते तेथील नागरिकांचे आरोग्य आनंदाने निवास करते. परदेशातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण झाली, त्यांनी ती जोपासली. त्यामुळे त्यांची शहरे स्वच्छ आहेत. आपली शहरे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे.




