पिंपरी : शहराच्या विकासासाठी व प्रभागातील भविष्याचा विचार करता अजितदादा यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेत आज भाजपचे माजी नगरसेवक संजय नेवाळे यांनी पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी नगरसेवक विक्रांत लांडे, मयूर कलाटे, संजय वाबळे, विकास साने, विलास भोईर, नितीन नाणेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार गट राज्यातील महायुती सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होण्याचे निर्णय घेतला. शहरातील सर्वच कार्यकर्ते अजितदादा सोबत गेल्याने शरद पवार गटाला शहराध्यक्ष पद देण्यासाठी साडेतीन महिने लागले. शरद पवार गटाला शहराला भाजपमधून आलेल्या नवख्या नगरसेवकाला नवीन शहराध्यक्ष पद द्यावे लागले. शहरातील एकही जुना जाणकार नेतृत्वाने अजित पवार यांची साथ सोडली नाही. भाजपाची साथ सोडलेले माजी नगरसेवक संजय नेवाळे यांनी प्रभागातील विकासासाठी अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.




