नवी दिल्ली : देशात लोकशाहीचे वारे वाहत असताना एनडीए विरुद्ध इंडिया गाडीचे जोरदार प्रचार यंत्रणा सुरू आहे. इंडिया गाडीच्या भोपाळ येथील शुभारंभाची पहिलीच सभा रद्द झाल्यानंतर India आघाडीत सर्व काही अलबेला आहे असे दिसत नाही. तर थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वतः एकटे भिडत आहेत. या दोन्हीही नेत्यांच्या मधील सुप्त संघर्ष देशातील जनतेने 2014 पासून पाहिला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यामधील तुम्हारे पास क्या है या मोदींच्या प्रश्नावरती मेरे पास पुरा देश है असे राहुल गांधी यांच्या टीजरने सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे.
नरेंद्र मोदी: मेरे पास ED है, पुलिस है, सत्ता है, पैसा है, दोस्त है.. क्या है तुम्हारे पास?
राहुल गांधी: मेरे साथ पूरा देश है ❤️ pic.twitter.com/IMY6MHVz8q
— Congress (@INCIndia) September 16, 2023
राहुल गांधींनी संसदेत सर्व मोदी चोर आहेत असे म्हटल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सरकारी बंगला ही खाली करण्यात लावला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने पुन्हा राहुल गांधी यांना खासदारकी परत दिल्यानंतर राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांच्यात पॉलिटिकल वॉर सुरू झाले आहे. त्यातील एक भाग या टीझर मध्ये दाखविण्यात आला आहे. पीम नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संभाषण दाखवण्यात आले आहे. यावेळी मोदी साहेब यांनी माझ्याकडे सत्ता हैं… पोलीस है… ईडी है… दोस्त है….सीबीआय है… पंतप्रधान की खुर्ची है… तुम्हारे पास क्या है… असा सवाल राहुल गांधी यांना विचारण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनी माझ्याकडे संपूर्ण देश आहे. असा संदेश लोकांना भावनिक करणारे टिझर लॉन्च करून लोकांच्या मनात राहुल गांधी यांच्या विषयी वेगळी भावना तयार करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे.




