पिंपरी (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा अनधिकृत रुफटॉप हॉटेलचे वरील हॉटेल व फुटले आहे. दुर्घटनेस रणरणान्या हॉटेलवर कारवाई करायची सोन से अधिकृत करण्याचा महापालिका प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. प्रशासनाने आत्तापर्यंत ४८ टॉप हॉटेल मालकांना केवळ नोटीसा पाठविल्या आहेत.
पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी, पिंपळे गुरव, प्राधिकरण, भोसरी, पिंपळे निलख, स्पाईन रोड, थरमॅक्स चौक, चिखली, चिंचवड या भागात शहरांमध्ये सर्वाधिक हॉटेल संख्या आहे. अनेक व्यवसायिकांनी इमारतीच्या टेरीस गच्ची वरती अधिकृतपणे हॉटेल व्यवसाय सुरू केले आहेत. निवांत वातावरणात उंचीवर अशा हॉटेलला अनेक खवय्ये प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र अशा हॉटेल व्यवसायिकांनी कोणतेही रीतसर परवानगी न घेता हॉटेल साठी लागणारे किचन बनवले आहेत.
अनधिकृतपणे पोटमाळे, बैठक व्यवस्था व अनधिकृत व्यवसाय मोठ्या प्रमाणात राजरोस पणे सुरू आहे. या अनधिकृत व्यावसायिकावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करणे अपेक्षित असताना सर्व रुफटॉप हॉटेल्स अधिकृत करण्याच्या हालचाली प्रशासकीय विभागात जोरदार सुरू आहेत. एकीकडे सर्वसामान्यांची घरे पडताना अतिक्रमण विभाग कोणतीही दयामया दाखवत नाही. तर दुसरीकडे लाखो रुपये कमवणाऱ्या हॉटेल व्यवसाय त्यावर अधिकरण विभाग मेहरबान होत कोणतीही कारवाई करत नाही.
शहरात एकही रुफटॉप हॉटेल अधिकृत नाही. हॉटेलमालकांनी ती अनधिकृतपणे सुरू केली आहेत. अग्रिशमन यंत्रणा नसल्याने ४८ रुफटॉप हॉटेल मालकांना नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर कारवाईसंदर्भात बांधकाम परवानगी विभागास कळविले आहे. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही.
विजयकुमार थोरात,
सहाय्यकआयुक्त, अग्निशमन विभाग
- नियम तपासूनच अधिकृतचा विचार
शहरातील रुफटॉप हॉटेलच्या मालकांनी महापालिकेत नुकतीच भेट घेतली. रुफ टॉप हॉटेल अधिकृत करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार रुफटॉप हॉटेल अधिकृत करण्यासाठी काय करावे लागेल. कोणत्या कागदपत्रांची पूर्तता पूर्तता करावी लागेल. नियमात बसून ही हॉटेल अधिकृत होतील का, याबाबत विचार सुरू आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, यांनी सांगितले..




