पिंपरी ( प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. मात्र, या भागातील रस्ते, ड्रेनेज लाइन काही प्रमाणात मंद गतीने सुरू आहे. येणाऱ्या अडीच-तीन वर्षांत या भागात दहा हजार फ्लॅट तयार होणार आहेत. मात्र, या भागात महापालिकेच्या वतीने अद्याप मुलभूत सुविधा पुरविल्या नाहीत, पाण्याची मोठी समस्या आहे.
दुसरीकडे महापालिका आमच्याकडून फ्लॅटधारकांना पाणी देण्यासंदर्भात लिहून घेत आहे. शहरात जुन्या इमारतीचे पुनर्विकास करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संख्या कमी आहे. मात्र, पुनर्विकास करणान्या बांधकाम व्यावसायिकांची शहरातील नागरिकांना मोठी गरज आहे. बजेट होमची मागणी वाढत आहे. मात्र, बजेट होम बनविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संख्या कमी झाल्याचेही सागर आगरवाल यांनी सांगितले.
शहरातील ताथवडे, पुनावळे भाग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या भागात फ्लॅट घेण्यासाठी नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडचा विकास वेगाने होत आहे. त्यामुळेच क्रिसालाच्या वतीने ताथवडे परिसरात आकर्षक ऑफरमध्ये फ्लॅट नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे क्रिसाला कंट्रक्शनचे सागर आगरवाल यांनी सांगितले.




