पिंपरी ( प्रतिनिधी) गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात उद्योगनगरीत आगमन शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच उपनगरांमध्ये आणि नागरिकांच्या घरी गणरायाचे मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आले. या गणरायाच्या समोर विविध गणेश मंडळांनी वेगवेगळे विषय घेऊन देखावे सादर केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी शहरातील नागरिक गणेश चतुर्थीच्या दिवशी गर्दी करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात व झाले. उपनगरांमध्ये विविध गणेश मंडळांनी आकर्षक अशी विद्युत रोषणाई तसेच ऐतिहासिक व पौराणिक आणि विज्ञान आधारीत देखावे सादर केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्त व नागरिक चिंचवड, आकुर्डी, पिंपरी, साने चौक, भोसरी, चिखली, मोशी येथे गर्दी करत आहेत.




