नवी दिल्ली : दिल्लीतील नवीन संसद भवनात भरवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी लोकसभेत मोठा गदारोळ उडाला. लोकसभा सभागृहात भाजपच्या एका खासदारानी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने चक्क संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना माफी मागावी लागली. या वक्तव्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष करत रमेश विधुरी यांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी केली.
चांद्रयान-३ मिशनवरील चर्चेदरम्यान दिल्लीतील भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बहुजन समाजवादी पार्टीचे खासदार कुंवर दानिश अली यांच्याविरोधात अशी आक्षेपार्ह भाषा वापरली की, लोकसभेत एकच खळबळ उडाली.. रमेश बिधुरी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
चांद्रयान-3 मिशनवरील चर्चेदरम्यान दिल्लीतील भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बहुजन समाजवादी पार्टीचे खासदार कुंवर दानिश अली यांच्याविरोधात अशी आक्षेपार्ह भाषा वापरली की, लोकसभेत एकच खळबळ उडाली. रमेश बिधुरी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही रमेश बिधुरी यांना ताकीद दिली असून सभागृहात सन्मानजनक भाषा वापरण्यास सांगितले आहे. 18 सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेश आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात बहुमताने समंत झाले. मात्र, या विशेष अधिवेशनाच्या शेवटाला संसदेच्या कामकाजादरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी चांद्रयान-3 मोहीम आणि इस्रोच्या यशावर बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक केले. ज्यावर रमेश बिधुरी यांच्या भाषणादरम्यान बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी उभे राहून काही प्रश्न उपस्थित केले. यानंतर भाजप खासदाराने असभ्य भाषा वापरून नाराजी व्यक्त केली.
विरोधकांनी निलंबनाची मागणी केली
भाजप खासदाराच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रमेश बिधुरी यांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी केली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले, जर त्याने दहशतवादी म्हटले असेल तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. हे शब्द संपूर्ण मुस्लिम समाजाविरोधात वापरले गेले. मला समजत नाही की भाजपशी संबंधित मुस्लिम हे कसे सहन करतात? यावरून कळते की ते आपल्याबद्दल काय विचार करतात? असेही ते म्हणाले.
विरोधकांचा गदारोळ; राजनाथ सिंहाची माफी
भाजप खासदाराच्या असभ्य भाषेवर विरोधकांनी आक्षेप घेतला. विरोधकांच्या गदारोळावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजप खासदाराचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असे सांगून अध्यक्षांना आवाहन केले की, विरोधी सदस्य या वक्तव्यावर नाराज असतील, तर हे शब्द कामकाजातून काढून टाकावेत. यानंतर राजनाथ सिंह यांनी खासदाराच्या वक्तव्यावर माफी मागितली. विरोधी पक्षाच्या खासदारांनीही राजनाथ सिंह यांच्या या कृतीचे कौतुक केले.
लोकसभा अध्यक्षांनी फटकारले
लोकसभा अध्यक्षांनीही रमेश बिधुरी यांना त्यांच्या वक्तव्यावरून फटकारले आहे. अध्यक्षांनी बिधुरीला सावध केले आहे आणि भविष्यात सावध राहण्यास सांगितले आहे. सभापती ओम बिर्ला यांनी भाजप खासदारांना सभागृहात भाषेची शिष्टाई राखण्यास सांगितले आहे. तसेच सभागृहाच्या कामकाजातून असभ्य शब्द काढण्यात आले आहेत.




