मावळ तालुका भाजपा अध्यक्षपदी कुसगाव (लोणावळा) येथील पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय ऊर्फ भाऊसाहेब गुंड यांची निवड करण्यात आली. याबाबत वडगाव मावळ येथील भाजपा कार्यालयात विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुंड यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आता भाजपला सर्व निवडणुकांना सामोरे जायचे आहे.
पत्रकार परिषदेस मावळ भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळसकर,माजी सभापती निवृत्ती शेटे,ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे,राजाराम शिंदे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, गणेश गायकवाड, माऊली शिंदे, शांताराम काजळे,सुकन बाफना, रामदास गाडे, संतोष कुंभार, बाळासाहेब घोटकुले, किरण राक्षे, संभाजी येवले, अरुण लाड, अनंता कुडे आदी उपस्थित होते.
माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी या वेळी बोलताना गेल्या चार वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाचा आढावा मांडला. यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींवर पक्षाचा झेंडा,मराठा आरक्षण, वीजबिल माफीसाठी केलेले आंदोलन, सहाय्यक निबंधक विरोधी आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगितले. तसेच विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून पक्षाने सोपवलेली जबाबदारी ही यशस्वी करू असा विश्वास व्यक्त केला.