बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी ( २३ सप्टेंबर ) बारामतीच्या दौऱ्यावर होते. अजित पवारांनी बारामतीत विविध विकासकामांची पाहणी केली. तसेच, बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही अजित पवारांनी घेतली आहे. यानंतर एक कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
“आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं अर्थखातं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
बारामतीत ४२ कोटी रूपये खर्च करून क्रीडा संकुलाचं काम सुरू झालं आहे. त्यासाठी मार्केट कमिटीला ५ कोटी रूपये देऊन जागा घेण्यात आली आहे. म्हणजे मार्केटला जागा देताना मी फुकट देतो, पण त्यांची जागा घेताना ५ कोटी दिले,” अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली.



