
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेत एटीएमसाठी कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनमधील कर्मचाऱ्याने एक कोटी पाच लाख लंपास केले. ही घटना दिनांक १४ ऑगस्ट रोजी धुळे चौफुली परिसरात घडली. शहरातील स्टेट बँकेचे मुख्य शाखेतून रायटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एक कोटी पाच लाखाची रक्कम सोमवारी दुपारी घेतली ती सात एटीएम मध्ये भरली जाणार होती. सुरक्षेची पुरेपूर व्यवस्था असलेले वाहन घेऊन चालक सुरक्षारक्षक आणि तीन कर्मचारी निघाले होते.
धुळे चौफुलीवर त्यातील राकेश चौधरी यांनी टोकारतालाव रस्त्यावरील एटीएम मध्ये भरणा करण्यासाठी २० लाखांऐवजी संपूर्ण १ कोटी ५ हजाराची रक्कम घेऊन दुचाकी वरून निघाला. त्यानंतर तो फरार झाला असून त्याकडे इतकी मोठी रक्कम दिलीच कशी?, कॅश पुरवठा करणारे वाहन का नेले नाही?, दुचाकीवरून तो का गेला? असे प्रश्न उपस्थित होत असून सरकारी कर्मचाऱ्यांचीही याबाबत चौकशी सुरू आहे.