पिंपरी (प्रतिनिधी) काम करीत असताना अकराव्या मजल्यावरून पडल्याने सुताराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३) दुपारी थेरगाव येथे घडली.
राम नरेश यादव (वय ४९, रा. वाकड) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राम यादव हे थेरगाव येथील सिव्हर क्रिस्टल या करीत होते. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांचा तोल गेल्याने ते खाली sacमध्ये पडले. जखमी झालेल्या यादव यांना त्वरीत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले..




