पिंपरी (प्रतिनिधी)- राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी बापू बांगर यांची सातारा शहर अपर पोलीस अधीक्षक पदावरून पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.
शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी याबाबत मंगळवारी (दि. ३) आदेश दिले आहेत. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आंचल दलाल हे सांगली येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांची सातारा येथे अपर पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली. तर सातारा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले बापू बांगर यांची पिंपरी चिंचवड शहरात पोलीस उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.
नुकतेच अपर पोलीस आयुक्त यांचे एक आणि उपायुक्तांनी दोन पदे मंजूर झाली आहेत. त्यातील दोन पोलीस उपायुक्त आयुक्तालयात हजर झाले आहेत. दरम्यान अपर पोलीस आयुक्तांऐवजी पोलीस उपायुक्त पदावरील एक अधिकारी देण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यास शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस उपायुक्त बापू बांगर यांची शहरात बदली केली आहे.




