
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी टोलदरवाढी विरोधात मुंबईत पत्रकार परिषद घेतल्यानंतर शहरातील विविध टोलनाक्यावर याप्रश्नी पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. टोल हा एक मोठा घोटाळा, भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. टोल दरवाढ मागे न घेतल्यास टोलनाके जाळून टाकू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर मुलुंड टोल नाका येथे प्रतीकात्मक आंदोलन करणाऱ्या मनसे नेते व ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे कार्यकर्ते संतप्त झाले.