पिंपरी (प्रतिनिधी) उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे कायद्याने गुन्हा आहे. अशा तळीरामांवर पोलीस वेळोवेळी कारवाई करतात. मात्र लिंक रोड चिंचवड पोलीस चौकीच्या मागील आणि पुढील बाजूस बीआरटी मार्ग व बसथांब्याकडे जाणाऱ्या मार्गावर दररोज तळीराम दारू पिण्यासाठी वसतात आणि पोलीस त्याच्यावर काहीच कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी चिंचवड लिंक रोडवर एम्पायर इस्टेट पुलावर जाण्यासाठी लिंक रोड येथील पोलीस चौकीच्या मागे अवघ्या काही फूटांवर जिना आहे. तसेच येथील बीआरटी मार्गावरील बस घांकडे जाण्यासाठी रस्त्याच्या पलिकडे जना आहे. या दोन्ही जिन्यांवर रात्रीच्यावेळी तळीराम दारू पिण्यासाठी तसेच अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी बसतात. एवढेच नव्हे तर हे तळीराम गोंधळ घालत जिन्यावर बाटल्या फोडतात. मात्र त्यांचा हा गोंधळ लिंक रोडवरील चिंचवड पोलीस चौकीतील पोलिसांना कधीच ऐकू जात नाही.
तळीरामांच्या या दहशतीमुळे पादचारी व प्रवासी यांना या जिन्याचा वापर करता फोडत असल्याचे सर्वत्र काचा पडलेल्या पि असतात. पहाटेच्यावेळी या जिन्यावर क पुलावर मॉर्निंग वॉकसाठी अनेक नागरिक ज ये-जा करीत असतात. त्यांच्या पायाला के बाटलीच्या काचा अनेकदा लागल्याही रा आहेत. चिंचवड पोलिसांनी या तळीरामांवर कारवाई करावी, अशी मागणीही यापूर्वी अनेकदा जाहीररित्या करण्यात आली आहे. तरीदेखील या तळीरामांना आवर घालण्यात पोलिसांना सपशेल अपयश आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.




