पिंपरी : शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा दोन गटात शिवसेना विखुरली आहे. त्यात आता ठाकरे गटातील शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर नाराज असलेले शिवसैनिक पक्षातून बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत असल्याचे सांगितले जाते. काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची भेट घेतली असून, सत्तेवर असलेल्या शिंदे गटात ‘इनकमिंग, तर सत्तेबाहेर फेकलेल्या ठाकरे गटातून ‘आऊटगोइंग’ मोठ्या प्रमाणात सुरू होणार असल्याची चिन्हं आहेत.
शिवसेनेची दोन तुकडे झाली असतानाच जिल्ह्यातील शिवसेना अंतर्गत गटबाजीने पोखरत चालली आहे. सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. जुन्या-जाणत्यांना केले बाजूला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी संपर्कात असलेला गट पक्षात नाराज आहे. शहरात शिवसेना वाढविण्याचे कार्य केल्यावरही आता जुन्या जाणत्या शिवसैनिकांना बाजूला केले जात असल्याची खंत नाराज नेत्यांनी व्यक्त केली. अशीच गटबाजी कायम राहिली तर उद्धव ठाकरे गट विरोधकांशी कसा लडेल, शिवसेनेला शहरात भविष्य आहे काय, असे प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना भेडसावत असून, सच्चे शिवसैनिक दोन गटांच्या वादात अडकले आहेत.
शिंदे गटाच्या संपर्कात
पक्ष बळकट करण्यासाठी बेरजेचे राजकारण केले जात आहे. शिवसेना मात्र शहरात बॅकफु- टवर गेली आहे. शहरातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एक मोठा गट एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे. त्यात आजी-माजी पदाधिका- यासह जुन्या शिवसैनिकांचा समावेश आहे.
■ काही पदाधिकायांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची भेट घेतली आहे. त्यामध्ये पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे सत्तेच्या बाहेर असलेल्या ठाकरे ” गटातून आऊटगोईंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात अस्तित्व जाणवतच नाही!
शहरातील ठाकरे गट अंतर्गत गटबाजीने काही दिवसांपासून थंडावल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात किंवा केंद्र सरकारच्या विरोधातील पिंपरी- चिंचवड शहरातील निषेध मोर्चामध्येही त्यांचे अस्तित्व जाणवले नव्हते.
आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही किया कोणी दुसया गटात प्रवेश करणार नाही. दसरा मेळाव्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सगळे व्यस्त आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला शहरातील कमीत कमी १०० बस भरून शिवसैनिक नेणार आहोत.
–सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)




