)
पुर्नविकास करताना
पालिका प्रशासनाने मोडकळीस आलेल्या किंवा राहण्यास धोकादायक असलेल्या इमारतीचा पुर्नविकास होऊ शकते. त्याचबरोबर इमारत 25 वर्ष जुनी असेल तरच तुम्ही ती पुर्नविकासासाठी देऊ शकता.
उपनगरातील क्लस्टर पुनर्विकासासाठी किमान जागेचा आकार 6,000 चौरस मीटर आहे. तर, उपमगरात इमारतीच्या पुर्नविकासासाठी किमान भूंखडाचा आकार (प्लॉट) 4,000 चौरस मीटर असेल. क्लस्टर पुनर्विकासासाठी फ्लोर स्पेस इंडेक्स (FSI) 10 आहे. म्हणजे 1,000 चौरस मीटरच्या भूखंडावर बिल्डर 10,000 चौरस मीटर बांधकाम करू शकतो.
रहिवाशांना काय फायदा होतो
इमारत पुर्नविकासासाठी देताना रहिवाशांनी योग्य ती काळजी व शहानिशा करणे गरजेचे आहे. तरच रहिवाशांना नफा होतो. नियमांनुसार, रहिवाशांना नवीन इमारतीतल 55 ते 60 टक्के जास्त जागेसह घरे दिली जाताता. त्यामुळं या सगळ्या चर्चा आधीच बिल्डरसोबत बोलून घ्याव्यात.
बिल्डरला हे प्रश्न विचाराच
पुनर्विकासासाठी सोसायटीने सभेचे आयोजन करावे. पुनर्विकास कार्यक्रमाची रूपरेषा तयार करावी. विशेष सर्वसाधारण सभेत ५१ टक्क्यांपेक्षा जास्त बहुमताने निर्णय मंजूर झाल्यानंतरच इमारत पुर्नविसासाठी जाऊ शकते. बिल्डरसोबत तीन महिन्याच्या आत करारनामा करून घ्यावा तसंच, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत निवासाची पर्यायी सोय किंवा घराचे भाडे बिल्डरने द्यावे, अशी मागणी करावी. तसंच, बांधकाम प्रकल्पाचा कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त असणार नाही, याची खातरजमा करुन घ्यावी.