पिंपरी, दि. २८ ऑक्टोबर :- पिंपरी चिंच2023वड महानगपालिकेच्या हद्दीतील सर्व उद्याने कोजागिरीच्या निमित्ताने आज दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील अशी माहिती उद्यान विभागाने प्रसिद्धीस दिली आहे.
कोजागिरी पौर्णिमेला उकळलेलं दूध पिणं अधिक महत्त्वाचं का?
असं म्हटलं जातं की, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतसारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवतात. असं केल्याने चंद्राची किरणं त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो, असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खीर प्रसाद म्हणून दिली जाते. या दिवशी चंद्रप्रकाशात खीर (Kheer) ठेवून तिचं सेवन केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते, असं मानलं जातं.
- कोजागिरी पौर्णिमा 2023 चंद्रोदयाची वेळ
शरद पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 05 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे.
- कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजेचा मुहूर्त
शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. यंदा देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी रात्रीचे तीन शुभ मुहूर्त आहेत. शुभ-उत्तम मुहूर्त रात्री 08:52 ते 10:29 पर्यंत आहे, अमृत-सर्वोत्तम मुहूर्त रात्री 10:29 पासून ते 12:05 पर्यंत आहे आणि चार-समन्वय मुहूर्त 12:05 ते 01:41 पर्यंत आहे. रात्रीच्या या तीन मुहूर्तांमध्ये तुम्ही कधीही लक्ष्मी देवीची पूजा करू शकता.




