सातारा : पेट्री (ता. सातारा) येथील राज कास हिल रिसोर्टवर सातारा तालुका पोलिसांच्या पथकाने शनिवारी छापा टाकला. यात सहा बारबाला व त्यांच्यासोबत नाचणारे १८ जण, हॉटेल मालकासह २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत ८३ हजारांची रोकड, मोबाईल हँडसेट, साउंड सिस्टिम, डिस्को लाइट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलिस ठाण्यात सुरू होती.




