पिंपरी: ‘शेवटच्या घटकांपर्यंत विकास…” हा भाजपाचा विचार आहे. याच विचाराने प्रभावित होवून पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने मावळ तालुक्यातील कुसावली, वानगाव, नागवली, डाहुली येथील कातकरी, आदिवासी बांधवासाठी दिवाळी फराळ, मिठाई तसेच भाऊबीज निमित्त महिलांसाठी साडीचोळीचे वाटप करण्यात आले. यावेळी येथील चिमुकल्यांच्या, महिलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव, दिवाळीचा आनंद द्विगुणीत करून गेले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सीमेवर लढणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. आज आदर्श डोळ्यासमोर ठेवून भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर्षी आदिवासी बांधवांसह समाजातील तळागाळातील नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्याला शहर भाजपच्या वतीने प्रतिसाद देत आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी कुसावलीच्या सरपंच सौ. चंद्रभागाताई चिमटे, माजी सरपंच श्री. कैलास खांडभोर, ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ भालेराव, डाहुली ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. बळीराम वाडेकर, टाकवे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. स्वामी जगताप, माजी नगरसेवक श्री. जयवंतआप्पा बागल, श्री. मनोज ढोरे, श्री. योगेश चोपडे, भाजपा सरचिटणीस श्री. सागर फुगे, गणेश बँकेचे संचालक श्री. प्रमोद ठाकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. अजय दुधभाते, बाळासाहेब आसवले, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य श्री. संजय मराठे, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील कोकाटे, श्री. संदीप दरेकर, श्री. अनिकेत पाडाळे, श्री. उमेश झरेकर, श्री युवराज कदम, श्री. शुभम गायकवाड, श्री. मिलिंद कंक, श्री. जीवन जाधव, श्री. सुशांत जाधव, श्री. संतोष मांदळे, श्री. उल्हास असवले, श्री. अमित शिंदे, श्री. प्रसाद नवले, कुसावलीचे पोलीस पाटील मंगेश चिमटे, यांच्यासह गावातील तंटामुक्ती कार्यकर्ते, पोलीस पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




