विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये हाय व्हॉल्टेज सामना झाला. अतितटीच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचे सात गडी ढेर झाले. मोहम्मद शमीने जबरदस्त गोलंदाजी करत न्यूझीलंडचे सात फलदाजांना माघारी धाडलं. शमीने सात गडी बाद करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने न्यूझीलंडला बाद करत भारताची विश्वचषकाच्या फायनलमध्ये एन्ट्री झाली आहे.
मोहम्मद शमीने विश्वचषकात जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मोहम्मद शमीला स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, शमीला नंतरच्या काही सामन्यात शमीला खेळण्याची संधी मिळाली.
शमीने संघात स्थान मिळाल्यानंतर संधीचं सोनं केलं. शमीने धमाकेदार गोलंदाजी करत संघात स्थान पक्क केलं. विश्वचषकाच्या इतिहासात एका सामन्यात ७ गडी बाद करणारा मोहम्मद शमी पहिला गोलंदाज ठरला आहे.
शमीने न्यूझीलंडला फलंदाजांना भेदक मारा करत अनेक विक्रम केले आहेत. शमीने भारताच्या वनडे फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. शमी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.
शमी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक पाच गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. तर विश्वचषकात शमी सर्वाधिक जलद ५० गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे




