पुणे : मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधव यांना काळं फासण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं आहे. पवारांवर वारंवार टीका केल्यामुळेच हे कृत्य केल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. भांडारकर इन्स्टिट्यूट इथं कार्यक्रमासाठी परवानगी नाकारल्यानंतर त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे.
शरद पवार जिंदाबादच्या घोषणा
पुण्यात पत्रकार भवनजवळ पत्रकारांशी संवाद साधताना नामदेवराव जाधव यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. कार्यकर्त्यांनी थेट जवळ येऊन जाधव यांच्या तोंडाला शाई फासली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकानं जाधवांभोवतीकडं केलं. पण तरीही कार्यकर्ते जाधव यांच्यावर धाऊन जात होते. यावेळी हे कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शरद पवार जिंदाबाद अशा घोषणाही दिल्या.



