रायगड- आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाच्या वैचारिक मंथन शिबीराला सुरुवाात झाली आहे. या शिबीरासाठी राज्यभरातून नेते उपस्थित आहेत. दरम्यान, सुरुवातीला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात अजितदादांच्या नेतृत्वात नंबर एकचा पक्ष करुया असं आवाहन केलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी मित्र कोण… शत्रू कोण हे गणित कळले नाही… ही कविता बोलत अजितदादा पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, काही लोकांकडून लोकशाही टिकली पाहिजे असे सांगितले जायचे मग ती पक्षातील असो, राज्यातील मात्र जेव्हा पक्षातील लोकशाही अजितदादा पवार यांनी समोर आणली, त्यावेळी दादांना खलनायक ठरवण्यात आले, असं सांगत धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.



