नागपूर : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनेत १४ आमदार अपात्रता प्रकरणात दोन लाख पानांची कागदपत्रे तयार असून सहा निकाल लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ३४ याचिकांचे सहा गटांत वर्गीकरण केल्यामुळे विविध सहा निकाल लागणार असल्याचे समजते आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही २० डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तसेच या संदर्भात विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा कालावधी मागितला जाणार आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विधिमंडळाकडून याचिका दाखल करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष यावर विधानसभा अध्यक्ष राहुल शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे. तसे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सध्या विधानसभेत शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी सुरू आहे.
वेळेत निकालासाठी प्रयत्नशिल- नार्वेकर
नागपूरातील विधिमंडळात सातत्याने सकाळ आणि संध्याकाळी जवळपास दररोज सात तास सुनावणी घेऊन साक्ष पूर्ण करण्यात आल्या आहेत. आता पुढील कार्यवाही पूर्ण करून हे प्रकरण निकालासाठी बंद करण्याचे मी प्रस्तावित केले आहे. त्या अनुषंगाने सर्वांच्या सहकार्याने २० तारखेपर्यंत हे कार्य पूर्ण करायचा माझा प्रयत्न असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी म्हटले आहे.



