चिखली : मागील काही दिवसापासून खेड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्याने बुधवारी रात्री चिखली परिसरात एन्ट्री केला. नागरिकांनी चिखली परिसरात फिरताना पाहिले आणि एकच तारांबळ उडाली.
बिबट्याला पाहिल्यानंतर नागरिकांनी याबाबतची पोलीस आणि वनविभागाला माहिती दिली. संबंधित विभागाचे कर्मचारी सकाळी घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला पकडण्याच्या तयारीला लागले. इकडून तिकडे पळ काढणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. त्याला सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे.




