चाकण : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. अमोल कोल्हे कसे निवडून येतात हे पाहतो, असे आव्हान अजित पवार यांनी दिले. असेच आव्हान त्यांनी २०१९ साली विजय शिवतारे यांना दिले होते आणि शिवतारे यांचा पराभव झाला होता. हाच धागा पकडून अजित पवार गटाचे नेते सचिन खरात यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. तुमचाही या निवडणुकीत विजय शिवतारे होणार, असे आव्हान खरात यांनी दिले.




