मुंबई – शिवसेना ( ठाकरे गटाचे नेते ) आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी आज सकाळी १० च्या सुमारास ईडीच्या पथकाने धाड टाकली. या पथकात १० ते १२ अधिकाऱ्यांचा समावेश होता. मिळलेल्या माहितीनुसार जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रवींद्र वायकर यांच्या घरी झाडाझडती सुरू केली आहे. तसेच, वायकरांशी संबंधित सात ठिकाण्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.
यावरून आता भाजपा नेते किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’उद्धव ठाकरे आणि त्यांचे पार्टनर रवींद्र वायकर, अनिल परब, संजय राऊतांनी करोनात फक्त कमाई करण्याचं पाप केलं. जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरेंनी गैरमार्गानं रवींद्र वायकरांना जोगेश्वरी येथे २ लाख स्क्वेअर फूटांचं अनधिकृत हॉटेल बांधण्याची परवानगी दिली. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रकरण दाबलं,” असा आरोप सोमय्यांनी केली आहे.
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरण नेमकं काय ?
आमदार रविंद्र वायकर यांच्या संबंधीत जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरण प्रलंबित आहे, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. या आधारावरच ईडीने वायकर यांच्यावर मनी लाँड्रीचा गुन्हा दाखल केला होता.



