अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. अयोध्येला छावणीचे स्वरुप आले आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 22 जानेवारीला अयोध्येत होणार्या रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देशात यासाठी उत्साह दिसून येत आहे. जगभरातील भारतीय लोकं याची वाट पाहत आहे. कारण शेकडो वर्षानंतर राम मंदिर बनत आहे. यानिमित्ताने योगी सरकार या कार्यक्रमासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. संपूर्ण जगाच्या नजरा अयोध्येवर असतील. या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात हजारो व्हीव्हीआयपी शहरात येणार आहेत. करोडो रामभक्त हा कार्यक्रम टीव्ही चॅनेल्सवर पाहतील. यासंदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. योगी सरकारने 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. त्यानिमित्ताने काही राज्यांत सुट्टी आणि ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.




