अलिबाग : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाला. त्यानंतर भाजप-शिवसेनेतील अनेक इच्छुकांना आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागले. याच नाराजीतून अजूनही काही जिल्ह्यांना पूर्णवेळ पालकमंत्री मिळालेले नाही.
रायगड जिल्ह्याचीही अशीच स्थिती आहे. सध्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे. मात्र, आता रायगडच्या पालकमंत्री पदी अदिती तटकरे यांनी वर्णी लागणार असल्याची चिन्हं आहे. यंदा प्रजासत्ताकदिनी रायगड जिल्ह्याचे ध्वजारोहन अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आता शिंदे गट यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाने येत्या 26 जानेवारीला ध्वजारोहन करणाऱ्या मंत्री, पालक मंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या 26 जानेवारीला महिला बाळ कल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडणार आहे. मागील वेळी हाच ध्वजारोहण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडला होता. उदय सामंत यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. मात्र, ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने तिथे ध्वजारोहण करणार आहे,. मागील वेळीही त्यांनी रत्नागिरी येथे ध्वजारोहण केलं होते, आणि रायगडात जिल्हाधिकारी यांनी. मात्र, यावेळी मंत्री अदिती ह्या ध्वजारोहण करणार असल्याने पालक मंत्री पद त्यांनाच मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्रीपद अदिती तटकरेंना मिळणार?
पालक मंत्री पदाबाबत शिंदे गट शिवसेना मागील आघाडी सरकारच्या काळात प्रचंड नाराजी होती. त्यांनतर सत्ता बदलली आणि अदिती तटकरे पुन्हा मंत्री झाल्या. मात्र, शिंदे गट शिवसेना आमदारांनी विरोध केल्याने अद्याप त्यांना पालकमंत्रपद मिळू शकलेलं नाही. येत्या 26 जानेवारीच्या दिवशी ध्वजारोहण करणार असल्याने त्यांनाच रायगडचे पालकमंत्री पद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता शिंदे शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.



