पिंपरी : शहरात बेकायदा वास्तव्य करणार्या पाच बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेचे दहशतवादविरोधी पथक आणि निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई निगडीतील अंकुश चौकात करण्यात आली.
आरोपींपैकी तीन जणांनी गोवा येथून पारपत्र काढल्याचे समोर आले आहे. रॉकी सामोर बरूआ (वय 28), जयधन अमीरोन बरूआ (वय 28), अंकुर सुसेन बरूआ (वय 26), रातुल शील्फोन बरूआ (वय 28), राणा नंदन बरूआ (वय 25) अशी नावे आहेत.




