पिंपरी : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. जरांगे आज पुण्यातल्या खराडीमधून लोणावळ्याकडे मुक्कामासाठी रवाना झाले आहेत. पुणे शहरात अहमदपूर व प्रतिसादानतर मागील आठ तासापासून प्रतीक्षा करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील तमाम मराठी बांधवांसाठी मोठी बातमी समोर आली आहे जरांगे पाटील यांचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन केले आहे.
रात्री साडेनऊ वाजता औंध येथील सभा आटपून मराठा मोर्चा पिंपरी चिंचवड शहरात मार्गस्थ झाला. रात्री ९:४५ वाजता पाटील यांचे पिंपरी चिंचवड हद्दीत औंध हॉस्पिटल समोरील सांगवी फाटा येथे आगमन झाले. पिंपरी-चिंचवडमार्गे मराठा आंदोलक लोणावळ्यात दाखल होतील. रात्रीचा मुक्काम लोणावळा गावात होईल. लोणावळ्यात सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘मुंबईकडे निघाला मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या’असा इशारा देत कोल्हापुरातील मराठा कार्यकर्ते मंबईच्या दिशेनं रवाना झालेत. शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्याच्या माध्यमातून सरकारला इशाराच दिला आहे. मनोज जरांगे यांनी पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून मराठा कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत.





