मुंबई : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्यामुळे राजकारण तापले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदारासह तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात कोर्टाने त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्याच गोळ्या झाडल्या होत्या. गणपत गायकवाड यांनी सहा गोळ्या फायर केल्या होत्या. ह्या सर्व गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या. महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. गायकवाड तीन वेळा आमदार असून 2009 पासून सातत्याने निवडणूक जिंकत आहेत. गणपत गायकवाड हे दोन वेळा अपक्ष आमदार राहिले आहेत. शिवसेना नेते महेश गायकवाड हे माजी नगरसेवक असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. महेश गायकवाड हे उल्हासनगर शिवसेनेचेही प्रमुख आहेत.



